Action by Local Crime Branch : MD ड्रग्स विक्रीसाठी बाळगणाऱ्यावर कारवाई | Marathi News.

News@LCB...

    Chandrapur : शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत मेथामफेटामाइन(MD)ड्रग्स,हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीला 25 एप्रिल रोजी LCB ने ताब्यात घेऊन त्याच्याकडून 33.4 ग्रॅम M.D.ड्रग्स,किंमत अंदाजे 1 लाख,65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीसह गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुर्दशन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,यांच्या नेतृत्वात सपोनि.दीपक कांक्रेडवार,सपोनि.बलराम झाडोकार, पोउपनि.संतोष निंभोरकर,सफौ.स्वामीदास चालेकर, पोहवा.प्रकाश बलकी,किशोर वैरागडे,अजय बागेसर, जयसिंग,नापोशि.संतोष येलपुलवार,पोशि.प्रमोद कोटनाके,नितीन रायपूरे,गोपीनाथ नरोटे,मिलींद जांभुळे, चापोहवा.प्रमोद डंभारे,सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे.

#Action by Chandrapur Local Crime Branch...

                                        ----------//----------