News@Durga Visarjan...
Gadchandur : शहरात दुर्गा व शारदा देवी विसर्जन धुमधडाक्यात संपन्न झाले.डिजे, ढोलताशांच्या गजरात जेव्हा शिवाजी चौक येथे मिरवणुकीचे आगमन झाले तेव्हा दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचांदूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवी मंडळाध्यक्षांचा शाल-श्रीफळ, पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला तसेच मिरवणुकीच्या बंदोबस्तात उत्तम कामगिरी बजावणारे गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम व त्यांच्या सहकार्यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे,तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार,गडचांदूर भजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अरविंद डोहे,शहर महामंत्री तथा नगरसेवक रामसेवक मोरे,जेष्ठ नेते महेश शर्मा, तालुका व्यापारी आघाडी संयोजक विश्वंभर झाम,शहर महामंत्री हरीश घोरे,शंकर आपूरकर, अरविंद कोरे,युवा शहाध्यक्ष श्रीकांत सातपुते, बालाजी बळीराम पवार,गोपाल मालपाणी, शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ.शितल धोटे, शहर महामंत्री सौ.सपना सेलुकर,भाजप जिल्हा महिला आघाडी महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.संगीता पातुरकर,सौ.नयना चौधरी,जेष्ठ नेते मुरलीधर ढवस,सोशल मिडिया प्रमूख विनोद बट्टलवार, सतीश आत्राम,किसन चव्हाण,पोगुलवार सर, सौ.अर्चना आंबेकर,सौ.अपर्णा उपलेंचवार,सौ. अनिता उपलेंचवार,सौ शुषमा ढवस,सौ.सुमन पवार,सत्यदेव शर्मा,विलास केवट इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुखाने उपस्थिती होती.
मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आले होते.रात्री साडे दहाच्या सुमारास डिजे,ढोलताशे बंद करण्यात आल्याने काही मंडळांमध्ये नाराजी पहायला मिळाली.काही किरकोळ वादविवाद वगळता मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
#Gadchandur Durga Visarjan 2024...
#Gadchandur BJP...
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸