News@Suicide...
Brahmapuri : येथील एका 'एमबीबीएस' पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 16 जूलै रोज घडली आहे.आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली.पाणी कमी असल्याने ती बचावली,मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यामांवर व्हायरल होत आहे.मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. ईशा घनश्याम बिंजवे वयवर्ष 24,असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती ब्रह्मपुरी येथील रहिवासी असल्याचे कळते.तिने नदीच्या पुलावरून उडी घेतली.
नदी पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र,आत्महत्या करण्याचा निश्चय केलेल्या तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली.यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही.या घटने दरम्यान पुलावरून येणारे-जाणारे काही लोक व्हिडीओ काढत होते.मात्र,वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही.मृत्यूचे कारण अस्पष्ट असून,घटनेनंतर पोलिसांनी तिचा मृतदेह काढला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
#Brahmapuri Suicide report...
#A highly educated girl committed suicide by jumping into the river...
🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹💥🔹
