Country Liquor Shop NOC Case : दारू दुकान मंजुरी रद्द प्रकरण...

News@Liquor NOC Case...

Gadchandur : गेल्या दीड वर्षापूर्वी आमसभेत ठराव घेऊन सर्वानुमते रद्द करण्यात आलेल्या स्थलांतरीत नवीन दारू दुकानासाठी पुन्हा युद्धपातळीवर हालचाल सुरू झाली असून गावकरी विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.सदर ठराव रद्द करण्यात आल्याचे संपूर्ण कागदपत्रे संबंधीत विभाग कार्यालयात तेव्हाच सादर करूनही आता पुन्हा याठिकाणी दारू दुकान येत असेल तर याचा तिव्र विरोध केला जाईल.वेळप्रसंगी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक कार्यालयापुढे आंदोलन सुद्धा करण्यात येईल,असा इशारा गाववासीयांनी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

    सविस्तर असे की,चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात हरदोना ग्रामपंचायतच्या तत्कालीन महिला सचिवांनी गावातील भोळ्याभाबड्या नागरिकांना अंधारत ठेवून तसेच हळदी कुंकवाच्या एका कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली एका कागदावर उपस्थित महिलांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.दरम्यान 23 मार्च 2022 रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत मुंबई येथील दारू दुकान हरदोना ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतर करण्याबाबतच्या विषयाला गावकऱ्यांचा तिव्र विरोध असताना सुद्धा तत्कालीन ग्रामसेविकेने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात धोक्याने घेतलेल्या महिलांच्या त्या सह्यांचा वापर करून दारू दुकानाला मंजूरी दिली.सदर प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात गाजले होते हे मात्र विशेष.

      याची जाणीव जेव्हा गाववासीयांना झाली, तेव्हा अनेक घडामोडीनंतर पुन्हा 15 अक्टोंबर 2022 रोजी आमसभा आयोजित करण्यात आली.आणि लोकांना आंधारात ठेवून देण्यात आलेल्या त्या दारू दुकानाला मंजूरीचा ठराव नामंजूर करून रद्द करण्यात आला.दारू दुकानाचा ठराव रद्द करण्यात आल्याची माहिती आमसभेच्या ठरावासह संपूर्ण कादपत्रे खालपासून वरपर्यंत संबंधीत विभागाकडे सादर करण्यात आली.असे असताना मात्र, आता दीड वर्षानंतर पुन्हा सदर दारू दुकाना संदर्भात चौकशी व इतर बाबी तपासून तात्काळ अहेवाल पाठवण्याचे पत्र अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांना मुंबई वरून आले आहे.म्हणजे रद्द करण्यात आलेली दारू दुकान पुन्हा येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र असून संबंधीत विभागाने लोकांची भावना लक्षात घेऊन आमसभेत रद्द केलेल्या स्थलांतरीत या दारू दुकानासंदर्भात सत्य अहवाल पाठवावा, अशी विनंती वजा मागणी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.अन्यथा संपूर्ण गाववासी आपल्या कार्यालयापुढे आंदोलन करतील,असा इशारा देण्यात आला आहे.

#Case of Cancellation of Domestic Liquor Shop Approval...

      🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹